पगाारवाट…
Wednesday, June 11th, 2008 @ 4:07 pm | poetry
पगाारवाट…
कधी ऐकदा पगार होतोय;
वाट बघतायेत सारेच.
वेळ झाली बिलं भरायची;
वाट बघतायेत सारेच!
वाट लागलीये खिशाची;
वाट बघतायेत सारेच.
पाकिट चार चौघात उघडलं तर…
आत बघतायेत सारेच!
मोकळं-मोकळं, हलकं-हलकं
ऊठाय-बसायला सोप्पं!
डाएट म्हणा किंवा म्हणा उपास…
तंगी भोगतायेत सारेच.
बांकेचा अजुन मेसेज नाही अाला
फोन तपासतायेत सारेच.
कधी ऐकदा पगार होतोय;
वाट बघतायेत सारेच…
- हर्षद शर्मा
१० जून २००८
(डिस्लेमर: माझा पगार झालेला आहे!)
June 12th, 2008 at 2:32 am
took me a while to understand it, as I’m not too good with marathi, but it made me laugh. really funny poem.